औरंगाबाद- स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत सुरु करण्यात आलेल्या स्मार्ट बस अद्यापही रस्त्यावर आलेल्या नाहीत. त्यामुळे केवळ पेपरात बातम्या छापून आल्याने स्मार्ट सुरु होत नसते. शहरवासीयांना केवळ स्मार्ट बसचे गाजर महापालिकेने दाखवले असल्याची भावना शहरातील नागरिक व्यक्त करत आहेत २३ डिसेंबर रोजी युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते शहर स्मार्ट बसचे लोकार्पण करण्यात आले होते.
२३ डिसेंबर रोजी
मोठ्या थाटात गाजावाजा करत महापौर नंदकुमार घोडेले यांनी शहर स्मार्ट बस सेवेचे
लोकार्पण केले मात्र बस जर रस्त्यावर धावणारच नव्हती तर यांनी लोकार्पणाची नुसती
घाईच का केली. सध्या परिवहन महामंडळाच्या शहर बस सुरु आहेत, त्या बस तरी निदान वेळेवर सोडा. केवळ
पेपरात बातम्या छापून आल्याने स्मार्ट सुरु होत नसते. शहरवासीयांना केवळ गाजर
दाखवण्याचं काम स्मार्ट बसच्या माध्यमातून घोडेले यांनी केले असल्याच्या भावना
नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत.
एसटी महामंडळाशी
महापौरांची बैठक
यासंबंधी महापौर
नंदकुमार घोडेले यांनी एसटी महामंडळाशी बैठक आयोजित केली होती. या बैठकीमध्ये ही
स्मार्ट बस नेमक कोणत्या दिवशी प्रत्यक्षात सुरु होतील यावर तोडगा निघालेला नाही.
सध्या एसटी महामंडळाकडून १६ शहर बस सुरु आहेत. किमान तेवढ्या बस तरी महापालिकेने
द्यायला हव्या होत्या तेव्हा त्या रस्त्यावर प्रत्यक्ष सुरु करता आल्या असत्या
मात्र ५ बस घेऊन कुठे जावं. असे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी घोडेले यांनी बोलावलेल्या
बैठकी नंतर संगीतले.
जानेवारीत सुरु होतील
बस
महापौर नंदकुमार
घोडेले यांनी स्मार्ट बस जानेवारीत सुरु होतील. असे सांगितले मात्र जानेवारीच्या
कोणत्या तारखेला बस सुरु होतील याबाबत त्यांनी हि अधिकृत माहिती दिलेली नाही.
त्यामळे जानेवारीत बस सुरु होतील कि नाही याबाबत साशंकता आहे.















